Home क्राईम संगमनेरमध्ये धक्कादायक! वाळू माफियाकडून थेट तहसीलदारांच्या घरी जाऊन शिवीगाळ व धमकी

संगमनेरमध्ये धक्कादायक! वाळू माफियाकडून थेट तहसीलदारांच्या घरी जाऊन शिवीगाळ व धमकी

Sangamner Crime: तहसीलदाराच्या घरी जाऊन एका वाळू तस्कराने त्यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना.

Sand mafia directly went to the Tehsildar's house and abused 

संगमनेर: संगमनेर तालुक्यात वाळू माफियांची मुजोरी चांगलीच वाढली आहे. वाळू तस्करांची मजल आता थेट तहसीलदारांच्या घरापर्यंत पोहोचली. तहसीलदाराच्या घरी जाऊन एका वाळू तस्कराने त्यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. याबाबत वाळूतस्कराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संगमनेरात खळबळ उडाली आहे.

संगमनेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळूचा उपसा होत आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू उपसा बाबत कठोर भूमिका घेऊनही संगमनेर तालुक्यात मात्र खुलेआम उपसा केला जात आहे. यामुळे वाळू तस्कर मुजोर झाल्याचे दिसत आहे. स्थानिक ग्रामस्थांना या वाळूतस्करांनी अनेकदा धमकावले आहे. त्यांची मजल आता थेट महसूल अधिकार्‍यांना धमकावण्यापर्यंत पोहोचले आहे.

शहरातील मालदाड रोड परिसरात राहणारा वाळू तस्कर शुभम थोरात हा सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मालपाणी नगर परिसरातील घरी गेला. त्याने तहसीलदारांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करून त्यांच्या घराची बेल वाजवली. त्याने घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तहसीलदारांनी दरवाजा न उघडल्याने या वाळू तस्कराने दरवाजावर थापा मारून शिवीगाळ केली.

यानंतर तहसीलदारांनी आपल्या घराचा दरवाजा उघडला. माझा कॉल का घेतला नाही असे म्हणून या वाळू तस्कराने तहसीलदारांना शिवीगाळ केली. यानंतर तो निघून गेला. याबाबत तहसीलदार धीरज बाळासाहेब मांजरे त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी शुभम थोरात याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे.

Web Title: Sand mafia directly went to the Tehsildar’s house and abused

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here