Home Accident News संगमनेर: महामार्गावर कार अपघातात  चालक ठार

संगमनेर: महामार्गावर कार अपघातात  चालक ठार

sangamner Accident Nevase Driver

संगमनेर | Accident: कार चालकाचा ताबा सुटल्याने महामार्गावरील हॉटेल श्री स्वामी समर्थच्या शेडवर जाऊन आदळल्याने हा अपघात घडला. या अपघातात दत्तात्रय कैलास धनवटे वय २६ नेवासे या चालकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पहाटे नाशिक पुणे महामार्गावरील नांदूर शिंगोटे येथे अपघात घडला.

दत्तात्रय धनवटे हा स्विफ्ट डिझायर (एम.एच. ०४ इटी ४१६५) घेऊन संगमनेरकडे येत असताना ही घटना घडली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यास दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. कार पलटी होऊन आदळल्याने कारचा चक्काचूर झाला. या अपघाताची माहिती मिळताच सिन्नर महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक निरीक्षक व्ही. आर. आढाव घटनास्थळी दाखल झाले, वाहन ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Web Title: Sangamner Accident driver Death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here