Home अकोले संगमनेरात व अकोलेत कडकडीत बंद

संगमनेरात व अकोलेत कडकडीत बंद

Sangamner Akole total Closed in Lockdown 

संगमनेर: राज्यसरकारच्या लॉकडाऊनळा संगमनेर व अकोले तालुक्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. पोलिसांनी नाकेबंदी करत वाहनासह नागरिकांची कसून चौकशी केली.

सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता दुपारी उन्हाचा तडाखा असल्याने भयाण शांतता पसरली होती. शनिवार व रविवार मेडिकल व वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. दोन दिवसांच्या लॉकडाऊनमुळे लोकांनी शुक्रवारीच भाजीपाला व किराणा खरेदी केला होता.

संगमनेर शहरात कायमच वर्दळ असलेला परिसर नवीन नगर रोड, तीन बत्ती चौक, नेहरू चौक, अकोले नाका आदी ठिकाणी शुकशुकाट होता. पोलीस सकाळीच रस्त्यावर उतरले होते. रस्त्यावरील नागरिकांची कसून चौकशी केली जात होती.

अकोले शहरात लॉकडाऊनला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. महात्मा फुले चौकात पोलीस यंत्रणा ही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना अडवून विचारणा करत होती. बसस्थानकावर पुणपणे शुकशुकाट होता. बाजारपेठेत भयाण शांतता होती. मेडिकल वगळता सर्व व्यवसाय बंद होती.

Web Title: Sangamner Akole total Closed in Lockdown 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here