Home क्राईम संगमनेर: शेतीच्या वादातून एकमेकांना कुऱ्हाड, कोयत्याने मारहाण

संगमनेर: शेतीच्या वादातून एकमेकांना कुऱ्हाड, कोयत्याने मारहाण

Sangamner beat each other with axes and sickles over agricultural disputes crime filed

संगमनेर | Crime: संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात शेतीच्या वादातून एकमेकांत कुऱ्हाड, कोयत्याने मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी घारगाव पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर गुलाब गायकवाड रा. अकलापूर ता. संगमनेर याने फिर्याद दिली असून त्याने दिलेल्या फिर्यादीवरून दशरथ भिका गायकवाड रा. अकलापूर, अक्षय गुलाब गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीवरून दशरथ भिका गायकवाड रा. अकलापूर याने फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून किशोर गुलाब गायकवाड रा. अकलापूर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतीच्या वादातून या दोनही फिर्यादीत कुऱ्हाड कोयता घेऊन एकमेकांत हाणामारी झाली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख हे तपास करीत आहे.

Web Title: Sangamner beat each other with axes and sickles over agricultural disputes crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here