Home संगमनेर संगमनेर भगवा मोर्चा, सर्वत्र भगवे वातावरण, घोषणांनी परिसर दणाणला

संगमनेर भगवा मोर्चा, सर्वत्र भगवे वातावरण, घोषणांनी परिसर दणाणला

Sangamner Bhagava March:  विघातक प्रवृत्ती आणि लव्ह जिहादच्या विरोधात संगमनेरात सकल हिंदू समाजाच्यावतीने भगवा मोर्चा.

Sangamner Bhagava march, saffron atmosphere everywhere, slogans rocked the area

संगमनेर:  विघातक प्रवृत्ती आणि लव्ह जिहादच्या विरोधात संगमनेरात सकल हिंदू समाजाच्यावतीने भगवा मोर्चा काढण्यात आला. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी संगमनेर आणि अकोले तालुक्यातील हजारोच्या संख्येने सहभागी झालेल्या हिंदु समाज बंधू भगिणींच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. सर्वत्र भगवे वातावरण निर्माण झाले होते.

संगमनेर नगरपालिकेजवळील लाल बहादुर शास्त्री चौकात सकाळी 9 वाजेच्या सुमारास हिंदु समाज जमण्यास सुरुवात झाली. बघता बघता हजारोच्या संख्येने हिंदु तरुण तरुणी मोर्चात सहभागी झाले, मोर्चा निघाला.

भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, गो माता की जय, लव्ह जिहाद कायदा झालाच पाहिजे, धर्मांतरण विरोधी कायदा झालाच पाहिजे, या घोषणांनी संगमनेर दणाणले. शास्त्री चौक, बाजारपेठ, तेलीखुंट, सय्यदबाबा चौक, मेनरोड, चावडी चौक, अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, संगमनेर बसस्थानक मार्गे हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडु नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Web Title: Sangamner Bhagava march, saffron atmosphere everywhere, slogans rocked the area

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here