Home संगमनेर संगमनेर: मुलींच्या वसतिगृहात शिरला बिबट्या

संगमनेर: मुलींच्या वसतिगृहात शिरला बिबट्या

Sangamner Bibatya entered the girls' hostel

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे बिबट्याचे वावर आढळून येत आहे. त्यातच बुधवारी धक्कादायक म्हणजे वसतिगृह परिसरात बिबट्या आढळल्याने भीतीचे वातावरण  निर्माण झाले होते.

संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे सुनांदाताई गहीनाजी भागवत मुलींच्या वसतिगृहात बिबट्या दिसून आला आहे.  सुनांदाताई गहीनाजी भागवत मुलींच्या वसतिगृह परिसरात बुधवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास आढळून आला.

नांदूर खंदरमाळ परिसरात बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेरात चित्रफित झाला आहे.  नांदूर खंदरमाळ येथे गहीनाजी भागवत मुलींचे वसतिगृह आहे.  वसतिगृहाच्या परिसरात रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दिसून आल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.  बिबट्या अचानक दिसून आल्याने वसतिगृहातील मुली घाबरल्या. यावेळी मुलीनी आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी वसतिगृहाकडे धाव घेतली. आरडाओरडा केल्याने बिबट्या तेथून पाय काढत धूम ठोकली.

Web Title: Sangamner Bibatya entered the girls’ hostel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here