Home Accident News Accident: संगमनेर: कार पलटून अपघात, चार जखमी

Accident: संगमनेर: कार पलटून अपघात, चार जखमी

Sangamner Car overturned accident

संगमनेर | Accident: तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ये नांदूर शिंगोटे रस्त्यावर वडझरी माथा शिवारात समोरून आलेल्या कंटेनरने हुलकावणी दिल्याने कार रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहे.

श्रीरामपूरच्या दिशेने चालक अविनाश रामलाल अहिरे रा, नाशिक हे तीन महिला व एक पुरुष असे चौघांना घेऊन कारने प्रवास करीत होते. दरम्यान वडझरी माथा शिवारात समोरून आलेल्या कंटेनरने हूल दिल्याने कार उलटून रस्त्याच्या कडेला साईड गटारात उलटली. या कारमधील चार जण गंभीर जखमी झाले. तारा अशोक जाधव व सुरेखा विष्णू दराडे व अन्य एक महिला व पुरुष नावे समजले नाही असे चार जण जखमी झाले. जखमींना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.   

Web Title: Sangamner Car overturned accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here