Home संगमनेर संगमनेर: अवैध वाळू उपसा करणारा डंपर पकडला

संगमनेर: अवैध वाळू उपसा करणारा डंपर पकडला

Sangamner Caught illegal sand dredging dumper

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील मुळा नदीपात्रातून अवैध वाळूचा (Sand) उपसा करणारे एक डंपर व सहा ब्रास वाळू असा एकूण १० लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जांबूत बुद्रुक ग्रामस्थांनी घारगाव पोलिसांना पकडून दिला आहे. ग्रामस्थांना पाहताच चालकाने डंपर सोडून पळ काढला. याप्रकरणी दोन जणांविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साकुर परिसरातील मुळा नदीपात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा सुरु आहे. जांबूत बुद्रुक येथील ग्रामस्थांनी अनेकदा घारगाव पोलीस ठाणे व महसूल विभागाला तक्रारी दिल्या आहेत. परंतु याचा उपयोग नसल्याने जांबूत बुद्रुक येथील ग्रामस्थ अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पाळत ठेऊन होते. शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास एका दहा चाकी डंपर क्रमांक एम.एच. १७ बीडी ७६९९ जांबूत रस्त्याने जात असल्याचे ग्रामस्थांना समजताच त्यांनी तो अडविला. ग्रामस्थांना पाहून चालकाने तेथून पळ काढला. याबाबतची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डंपर ताब्यात घेतला. चालक व मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक संतोष खैरे हे करीत आहे.

Web Title: Sangamner Caught illegal sand dredging dumper

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here