Sangamner Crime: मारहाण प्रकरणी पती सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल.
संगमनेर: संशय घेतल्याचा राग आल्याने संतापलेल्या पतीने आपल्या वकील पत्नीला मारहाण करत तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील घुलेवाडी परिसरात काल मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी सदर महिला वकिलाचा पती व सासू-सासरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पतीचे बाहेर संबंध आहे असे घुलेवाडी येथे राहणार्या एका महिला वकिलाने आपल्या सासुला सांगितले. याचा राग आल्याने तिच्या पतीने लाथाबुक्क्यांनी माराहाण केली. यावेळी सदर महिलेच्या सासू-सासरे यांनी या महिलेला बेडरूम मध्ये नेत तिचा गळा दाबून, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मारहाण करताना त्यांनी घराचे दरवाजे बंद केले होते. सासु सासरे हे दोघे मारहाण करत होते. मारहाणीत या महिला वकिलाच्या गळ्याला पोटाला छातीला मार लागला. यानंतर सदर विवाहितेला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत सदर महिला वकिलाने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष विठ्ठल जाधव, विठ्ठल पांडुरंग जाधव, मंदा विठ्ठल जाधव (सर्व रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध भादंवि 307,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Sangamner Crime Attempted murder of female lawyer by strangulation
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App