Home क्राईम संगमनेर: तक्रार का घेतली? म्हणत महिलेचा पोलीस ठाण्यातच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा...

संगमनेर: तक्रार का घेतली? म्हणत महिलेचा पोलीस ठाण्यातच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Sangamner Crime: असता प्रथम फिर्याद दाखल केलेल्या संबंधित महिलेने आरडाओरडा करत त्या महिलेची तक्रार लिहून घेण्यास अडथळा आणत पोलीस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन (Suicide) करण्याचा प्रयत्न.

Sangamner Crime oman attempted self-immolation by pouring petrol on her body in the police station itself

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 19) सकाळी एका 29 वर्षीय महिलेने पाच ते सहा जणांविरुद्ध विनयभंगांची फिर्याद दिली होती. दरम्यान दुपारच्या सुमारास या महिलेच्या फिर्यादीत आरोपी असलेली अलका बरकडे ही महिला गुन्हा दाखल करण्यासाठी आश्वी पोलीस ठाणे येथे आली असता प्रथम फिर्याद दाखल केलेल्या संबंधित महिलेने आरडाओरडा करत त्या महिलेची तक्रार लिहून घेण्यास अडथळा आणत पोलीस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी सदर महिलेविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत आश्वी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. 19 जून रोजी एका 29 वर्षीय महिलेने गणेश मच्छिंद्र माने, शुभम रामभाऊ बरकडे, छाया सखाराम जर्‍हाड, रामभाऊ कारभारी बरकडे, अलका रामभाऊ बरकडे व सखाराम भिवा जर्‍हाड यांचे विरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

त्यानंतर दुपारी 2 विजेच्या सुमारास पह्यि फिर्यादीत आरोपी केलील महिला अलका रामभाऊ बरकडे (वय 45, रा. कुभांरवाडी वरंवडी, हल्ली रा. मांची रोड, आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर) ही महिला आश्वी पोलीस ठाण्यात प्रथम फिर्याद देणार्‍या संबंधीत महिलेच्या आई – वडिलांविरूध्द तक्रार देण्यासाठी आली होती. अलका बरकडे यांनी सांगितल्याप्रमाणे महिला पोलीस कर्मचारी ताराबाई चांडे या फिर्याद लिहुन घेत होत्या. यावेळी प्रथम फिर्याद देणारी संबंधीत महिला पोलीस ठाण्यात आली व तु खोटी तक्रार का देते, तु आमचे विरुद्ध फिर्याद देवू नको, असे म्हणत आरडाओरडा करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

यावेळी पोलीस ठाण्यासमोर उभा असलेला तिचा भाऊ विकास अशोक मदने याने पेट्रोलची बाटली तिला आणून दिली व तुम्ही जर अलका बरकडे हिची तक्रार घेतली तर अंगावर पेट्रोल ओतुन मी व माझा भाऊ आत्महत्या करु असे म्हणत संबंधीत महिलेने अंगावर पेट्रोल ओतुन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत महिला पोलीस कर्मचारी चांडे, खेमनर तसेच पोलीस कॉस्टेबल काळे यांनी तात्काळ पळत जाऊन पेट्रोलची बाटली हिसकावुन घेतल्याने पुढील अनर्थ टाळला आहे.

दरम्यान आश्वी पोलीस ठाण्यात संबंधीत महिला व विकास अशोक मदने (दोन्ही रा. आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर) यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 145/2023 नुसार भारतीय दंड संहिता कलम 353, 309, 34 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष भंडारे हे करत आहे.

Web Title: Sangamner Crime oman attempted self-immolation by pouring petrol on her body in the police station itself

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here