Home क्राईम संगमनेर: विद्यार्थिनीची छेड काढत दोघांवर चाकू हल्ला

संगमनेर: विद्यार्थिनीची छेड काढत दोघांवर चाकू हल्ला

Sangamner Crime two were stabbed while teasing the student

Sangamner Crime | संगमनेर: संगमनेर शहरातील ओहरा महाविद्यालयातील विद्यार्थिनीला अडवून छेड काढत मदतीला आलेल्या दोघांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत तिघे जण जखमी झाले आहे. शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ओहरा कॉलेजच्या गेटसमोर ही घटना घडली. याप्रकरणी सात जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओहरा महाविद्यालयातील ही विद्यार्थिनी कासारवाडी येथे राहते. कॉलेज सुटल्यावर घराकडे जात असताना अकोले नाका येथे राहणारा अनिकेत दळे, अनिकेत मंडलिक, साई सूर्यवंशी व अन्य चौघांनी दुचाकीवर येत तिची छेड काढली. लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत शिवीगाळ केली. तिच्या मदतीला आलेला चुलत भाऊ यांनी बहिणीची छेड का काढली अशी विचारणा केली असता अनिकेत दळे याने चाकू काढून गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मागे सरकल्याने वार हुकला. त्यांना सात जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या हाणामारीत विद्यार्थिनी व दोघे जण जखमी झाले आहेत.    

Web Title: Sangamner Crime two were stabbed while teasing the student

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here