Home संगमनेर संगमनेर सहा बिबट्यांच्या हल्यात दोन शेळ्यांचा फडशा, महिला वाचली

संगमनेर सहा बिबट्यांच्या हल्यात दोन शेळ्यांचा फडशा, महिला वाचली

Sangamner Dadh khurd biabtya Attack 

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात दाढ खुर्द येथे वस्तीवर जनावरांच्या बंदिस्त गोठ्यावर एकाच वेळी सहा बिबट्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हल्ल्यात दोन शेळ्यांचा फडशा पडला आहे.

यावेळी महिलेने आरडाओरडा केल्याने तिच्यावर हल्ला करण्यात आला मात्र महिला थोडक्यात बचावली आहे. नानाभाऊ वाघमारे यांच्या बंदिस्त गोठ्यावर शिकारीच्या शोधात सहा बिबटे आले होते. गोठ्यातील शेळ्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे वाघमारे कुटुंब बाहेर पाहण्यासाठी आले असता दोन गेट समोर, दोन मागील बाजूला, तर तर दोन झाडाचा आधार घेत गोठ्यात शिरलेले दिसले. यावेळी बिबट्यांनी दोन शेळ्या ठार करून उचलून गोठ्याबाहेर नेल्या. यावेळी वाघमारे कुटुंब बिबट्याला हुसकाविण्यासाठी सरसावले तेव्ह बिबट्याने बबई वाघमारे या महिलेवर हल्ला केला. या महिलेच्या साडीला पंजा लागल्याने ती वाचली. या बिबट्यांना पकडण्यासाठी रात्री २:३० सुमारस वन विभागाचा फौज फाटा व अधिकारी घटनास्थळी दाखल होते.

Web Title: Sangamner Dadh khurd biabtya Attack 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here