संगमनेर: धनगर समाजाचा आरक्षण मागणीसाठी संगमनेरात रस्ता रोको
संगमनेर: धनगर समाजाचा आरक्षण मागणीसाठी संगमनेरात रस्ता रोको
संगमनेर: आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी शनिवारी सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने नासिक पुणे महामार्गावरील घुलेवाडी फाटा येथे रस्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलन आंदोलन कर्त्यांच्या वतीने प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
You May Also Like:Shahid Kapoor wife age | Mira Rajput
सकल मराठा मोर्चाला पाठींबा देत आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्च्यात मोठ्या प्रमाणावर समाज बांधव सहभागी झाले होते. त्यामुळे मोर्चाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. आरक्षणासाठी सरकारने समाजाला झुलवीत ठेवले म्हणून आज समाज रस्त्यावर आला आहे. काही पुढार्यांना हाताशी धरून समाजा समाजात भांडणे लावण्याचा सरकारने प्रयत्न केला असल्याचा आरोप समाजाच्या वतीने करण्यात आला.
आज घुलेवाडी फाटा येथे झालेल्या आंदोलनात सर्वत्र पिवळे झेंडे मोर्चामध्ये दिसत होते. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, छत्रपती शिवाजी महाराज कि जय , येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा यावेळी देण्यात आला. धनगर समाजाल १५ ऑगस्ट पूर्वी अनुसूचित जमाती मध्ये समावेश करावा समाजाला खोटी आश्वासने देवून झुलवत ठेवणाऱ्या सरकारवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलन कर्त्यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.