संगमनेर: वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या, अपमानास्पद वागणुकीला…
Sangamner Suicide Case: वाहनचालकाची पत्नी वाईट वागत असल्याचे समजले तसेच तिच्या माहेरच्या लोकांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने आत्महत्या.
संगमनेर: पत्नी वाईट वागत असल्यामुळे व तिच्या घरच्या मंडळीना कल्पना दिल्यावर माहेरच्या लोकांकडून अपमानास्पद वागणुकीला कंटाळून वाहन चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शहरालगत ढोलेवाडी परिसरात रविवारी घडली.
सोमेश बबन काकडे (वय 42, रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की , ढोलेवाडी परिसरात राहणार्या एका वाहन चालकाला पत्नी वाईट वागत असल्याचे त्याला समजले . यानंतर त्याने ही माहिती सासर्याला देखील दिली.आमच्या मुलीवर विनाकारण संशय घेतो असे सांगून या वाहन चालकाला त्याच्या सासरकडील मंडळींनी वारंवार अपमानास्पद वागणूक दिली. या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून त्याने आपल्या राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केली. ही घटना 14 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या पुर्वी घडली.
मयताच्या भावाने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी कविता सोमेश काकडे, नाना बापु शेळके, लता नाना शेळके, संतोष नाना शेळके (सर्व रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले करत आहेत.
मयत सोमेश काकडे हा संगमनेर शहरा लगत सासर्याकडे स्थाईक झाला. गाडी चालक म्हणून तो काम करत होता. ढोलेवाडी येथे सासर्याकडे राहत होता. मयत सोमेश व त्याची पत्नी यांच्यामध्ये नेहमी किरकोळ कारणावरून भांडण होत असे. भांडण झाल्यानंतर सासरचे लोक नेहमी त्रास देत असत अशी माहिती समोर आली आहे.
Web Title: Sangamner driver committed suicide by hanging himself