Home Suicide News संगमनेर: कर्जबोजामुळे शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

संगमनेर: कर्जबोजामुळे शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Sangamner farmer commits suicide by jumping into a well

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील कर्जुले येथील ४८ वर्षीय शेतकऱ्याने आपल्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी उघडकीस आली आहे.

दिलीप अर्जुन कोल्हे असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. फायनान्स कंपनीचे कर्ज, नापीक जमीन, दुध धंद्यात तोटा यामुळे आलेल्या नैराश्येतून आत्महत्या केली आहे.

याबाबत माहिती अशी कि, मयत शेतकरी दिलीप कोल्हे यांच्यावर विविध फायनान्स कंपनीचे कर्ज होते. नापीक शेती, दुध धंद्यात आलेला तोटा यामुळे कर्जाची परतफेड न झाल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. वसुलीसाठी असलेल्या तगाद्यामुळे आलेल्या नैराश्येतून दिलीप कोळे हे आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास कुणालाही न सांगता निघून गेले होते. बराच वेळ झाल्याने ते घरी न परतल्याने घरच्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. घरापासून काही अंतरावरच तअसणाऱ्या त्यांच्या विहिरीतच त्यांचा मृतदेह आढळून आला. स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner farmer commits suicide by jumping into a well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here