Home संगमनेर संगमनेर तालुक्यातील घटना: सासऱ्याचा सुनेवर अत्याचार

संगमनेर तालुक्यातील घटना: सासऱ्याचा सुनेवर अत्याचार

Sangamner Father-in-law's atrocities on ladies

संगमनेर | Sangamner: एका २७ वर्षीय तरुण सुनेवर सासऱ्याने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पती व सासरा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघानाही पोलिसांनी अटक केली आहे.

संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे शनिवारी दिनांक ६ रोजी तसेच २६ डिसेंबर २०२० रोजी ही घटना घडली आहे.

याबाबत पिडीतेने फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार, पिडीत महिलेने अत्याचारबाबत पतीकडे तक्रार केली असता तुला माझे वडील म्हणतील तसे ऐकावेच लागेल असे पती म्हणाला. खोलीत एकटी असताना सासरा खोलीत आला. मला तु फार आवडतेस असे म्हणून तोंड दाबून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याबाबत कोणाला काही सांगितल्यास तुला ठार मारीन अशी धमकी दिली. सासऱ्याने दोनदा अत्याचार केल्याने पतीला सांगितले, तुला माझे वडील म्हणतील तसे ऐकावेच लागेल असे पतीने सांगितले. तुमच्या विरोधात तक्रार देणार असे सांगितल्यावर पोटावर काठीने मारहाण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले अधिक तपास करीत आहे.  

Web Title: Sangamner Father-in-law’s atrocities on ladies

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here