Home संगमनेर साखरपुडा झाला, विवाह मोडला, तरुणीची विहिरीत उडी मारून आत्महत्या

साखरपुडा झाला, विवाह मोडला, तरुणीची विहिरीत उडी मारून आत्महत्या

Sangamner Hangevadi Young girl Suicide

संगमनेर: दोनही कुटुंबाच्या संमतीने साखरपुडा झाला, दागिन्यांची देवानघेवाण झाली मात्र विवाहपूर्वीच तिला अपशकुनी ठरवत, विवाहास नकार दिल्याने, पैसे व दागिनेही परत घेऊन फसवणूक केल्याने तरुणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वर पक्षाकडील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

भारती भास्कर सांगळे वय २६ रा. हंगेवाडी ता. संगमनेर असे या तरुणीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील हंगेवाडी येथील भारती भास्कर सांगळे या तरुणीचा चार महिन्यांपूर्वी विवाह ठरला होता. या दोनही कुटुंबात बोलणी होऊन त्यांचा हंगेवाडी येथे साखरपुडा झाला होता.

दोनही कुटुंबाच्या बोलणीतून ठरल्याप्रमाणे आरोपीला एक तोळ्याची सोन्याची अंगठी व दोन लाख रुपये विश्वासाने देण्यात आले होते. वरपक्षाने देखील दोन तोळे वजनाचे नेकलेस व कानाचे दागिने दिले होते. त्यानंतर आरोपीने भरतीला दिलेले दागिने व्यवस्थित करून देतो असे सांगून परत घेऊन गेला.

१ नोव्हेंबर रोजी रविवारी मयत भारती व तिचा भाऊ किरण अपशकुनी असल्याचे सांगत वरपक्षाने विवाह मोडला. तसेच सांगळे कुटुंबियांना शिवीगाळ व दमदाटी केली. घेतलेले पैसे व दागिने परत देण्यास नकार दिला. या घटनेमुळे भारती नैराश्यात गेली. यातूनच तिने टोकाची भूमिका घेत आत्महत्या केली.

याप्रकरणी किरण भास्कर सांगळे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार वरपक्षाकडील चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील अधिक तपास करीत आहेत.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Hangevadi Young girl Suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here