Home संगमनेर संगमनेर: कोठे खुर्द रस्त्यावर दरड कोसळली, मोठे दगड रस्त्यावर

संगमनेर: कोठे खुर्द रस्त्यावर दरड कोसळली, मोठे दगड रस्त्यावर

Sangamner News Kauthe Khurd fell in pain on the road

संगमनेर | Sangamner: काही दिवसांपासून पठार भागात काही प्रमाणात पाऊस झाला आहे. संगमनेर तालुक्याच्या कोठे बुद्रुकच्या भानुशी मळा येथे आंबी खालसा ते कोठे खुर्द रस्त्यावर दरड कोसळली आहे. मोठ मोठे दगड सरकत रस्त्यावर येऊन पडले आहे. रविवारी पहाटेच्या वेळी ही घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या रस्त्यावर मोठ मोठे दगड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास कळविले आहे. या रस्त्यालगत खालच्या बाजूस लोकवस्ती आहे. हे दगड रस्त्यावरच अडकल्याने लोकवस्तीकडे सरकले नाही. तसेच सुदैवाने कोणतेही वाहन जात नव्हते. यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.  बांधकाम विभागाला माहिती देण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता कडाळे घटनास्थळी पथक पाठविणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Sangamner News Kauthe Khurd fell in pain on the road

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here