Home संगमनेर Sangamner: संगमनेर खुर्द पुलावरून दुचाकीसह दोघेजण बुडाले

Sangamner: संगमनेर खुर्द पुलावरून दुचाकीसह दोघेजण बुडाले

Sangamner Khurd two drowned along with their two-wheeler

संगमनेर | Sangamner: रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संगमनेर खुर्दला जोडणाऱ्या प्रवरा नदीवरील लहान पुलावरून दोघे जणांनी धाडसाने दुचाकी घेऊन जाणारे दोघे जण दुचाकी घसरल्याने पाण्यात पडून वाहून गेले. त्यातील एकाला वाचविण्यात यश आले मात्र दुसऱ्याचा अजून शोध सुरु आहे.

शरद धोंडीबा कोल्हे रा. कोल्हेवाडी असे पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुनील चांगदेव आहेर रा. कोल्हेवाडी ता. संगमनेर याला वाचविण्यात यश आले. प्रवरा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे संगमनेर खुर्दला जोडल्या जाणाऱ्या छोट्या पुलावरून पाणी सुरु आहे. सुनील आहेर आणि शरद कोल्हे हे दोघे जण गवंडी काम करतात. ते दोघे एकाच दुचाकीवरून संगमनेरकडे निघाले होते. पुलावरून पाणी वाहत असताना धाडसाने गाडी पाण्यात घातली. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने दुचाकी घसरून दोघेही पाण्यात वाहून गेले. वाहून जात असताना नागरिकांनी आहेर याला वाचविले मात्र कोल्हे हा वाहून गेला आहे. त्याचा शोध सुरु आहे.

See Latest Marathi News

Web Title: Sangamner Khurd two drowned along with their two-wheeler

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here