संगमनेर: महिलेच्या पर्स मधून लुटले साडे आठ तोळ्याचे दागिने
संगमनेर: महिलेच्या पर्स मधून लुटले साडे आठ तोळ्याचे दागिने
संगमनेर: संगमनेर येथील बसस्थानकात अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या पर्समध्ये असणारे एक लाख २७ हजार रुपयांचे साडे आठ तोळे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केल्याची घटना सोमवार दिनांक २३ जुळली रोजी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी घडली. त्यामुळे गंठन चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याने महिलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि नंदा दिलीप गिरगे वय ४९ ही महिला अकोले तालुक्यातील कारखाना रोड निशिगंधा कॉलनी या ठिकाणी आपल्या कुटुंबासह राहते. त्या सोमवारी सकाळी अहमदनगर ला जाण्यासाठी संगमनेर बस स्थानकात आल्या होत्या. त्यानंतर एस.टी.बस मध्ये ही बसल्या होत्या पण त्याच वेळी पर्स ची चैन उघडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे त्या घाबरून गेल्या. त्यांनी पर्स मध्ये पहिले असता कोणी तरी अज्ञात चोरट्याने साडे आठ तोळ्याचे सर्व दागिने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आजूबाजूला प्रवाशांना विचारले पण काहीच उपयोग झाला नाही. एकूण एक लाख २७ हजार रुपयांचे हे दागिने होते.
याप्रकरणी नंदा गिरगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यान विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक अभय पारमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस श्री,बोडखे हे करत आहे.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.