Home संगमनेर संगमनेर शहरातील या हॉटेलचा परवाना निलंबित: जिल्हाधिकारी आदेश

संगमनेर शहरातील या हॉटेलचा परवाना निलंबित: जिल्हाधिकारी आदेश

Sangamner News License of this hotel in city suspended

संगमनेर | Sangamner News: संगमनेर शहरातील जुन्या नाशिक पुणे महामार्गावरील हॉटेल पूनम आणि परमिट बार चालकाने हॉटेलच्या नावात सिटी वाईन्स असा नियमबाह्य बदल करत ग्राहक व उत्पादन शुल्क विभागाची दिशाभूल केल्याने जिल्हाधिकारी यांनी सोमवारी हॉटेलमधील मद्यविक्रीचा परवाना निलंबित केला आहे. तसेच याप्रकरणी सात दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे.

संगमनेर येथील हॉटेल पूनम बार चालकाने राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडे हॉटेलच्या नावात बदल करण्यासंदर्भात अर्ज करून सदर नाव हॉटेल सिटी वाईन्स करण्याची परवानगी संभंधित विभागाकडून प्राप्त करण्यामागील हेतू हा बदल केलेल्या नावाचा उपयोग करून आपले परमिट रूम वाईन शॉप आहे असे भासवून ग्राहकांची दिशाभूल करण्याचे काम केले. परमिट रूमची भिंत पाडून रस्त्यालगत तीन शटरचे विनापरवाना बांधकाम करून त्याला वाईन शॉपचे स्वरूप देण्याचे काम केले. त्यामुळे वाईन शॉप आहे की परमिट रूम असे गोंधळ निर्माण केला.

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

तक्रारीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागच्या विभागीय विसंगतीचा गुन्हा नोंद केला आहे. या हॉटेल संदर्भात पुढील आदेश होईपर्यंत परवाना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

Web Title: Sangamner News License of this hotel in city suspended

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here