संगमनेर: मराठा मोर्चामध्ये चोरट्यांची हातसफाई
संगमनेर: मराठा मोर्चामध्ये चोरट्यांची हातसफाई
संगमनेर: संगमनेर येथील प्रांत कार्यालयावर मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दि. २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये काही चोरट्यांनी तीन जणांचे मोबाईल चोरून लोणीच्या दिशेने पळाले. यावेळी शहर पोलिसांनी या चोरट्यांचा संगमनेर ते लोणी पर्यंत पाठलाग करून पकडले. सुखदेव सखाराम गाडेकर रा.राजापूर, शोण दीपक थोरात रा.चंद्रशेखर चौक व निलेश भाऊसाहेब राहणे रा. चंदनापुरी हे तिघे ही प्रांत कार्यालयासमोर आलेल्या मोर्चात सहभागी झाले. या मोर्चात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने या गर्दीचा फायदा घेत दुपारी १२ वाजेच्या सुमारास सुखदेव गाडेकर यांच्या खिशातून सात हजार किमतीचा मोबाईल, शोण थोरात यांच्याकडील सात हजार किमतीचा तर निलेश राहणे यांच्य्याकडील ४३ हजार रु.किमतीचा आयफोन कंपनीचा मोबाईल त्याचा बरोबर काही जणांच्या खिशातील पाकिटे व पैसे चोरून दोघा चोरट्यांनी लोणीच्या दिशेने पोबारा केला.
पण मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी मोर्च्याचा ठिकाणी असणार्या पोलिसांना याबाबत सांगितले. संगमनेर पोलीस यांनी पाठलाग करत संगमनेर बस्स्थानाकाजवळ एकाला संशयित म्हणून पकडले व कसून चौकशी केली असता त्याच्याकडे मोबाईल सापडला. त्यांच्याकडून चोरी गेलेले मोबाईल जप्त करण्यात आले. पोलिसांनी अतिक शेख व सागर धिवर यांच्या विरोधात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.