Home संगमनेर माझा जीव माझीच जबाबदारी असे जनतेवर म्हणण्याची वेळ आली: विखे पाटील

माझा जीव माझीच जबाबदारी असे जनतेवर म्हणण्याची वेळ आली: विखे पाटील

Sangamner Nimon Covid center innovation

संगमनेर | Sangamner: कोरोनाबाबत महाविकास आघाडी सरकारच्या घोषणा फक्त कागदावरच राहिल्या आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही घोषणा केली खरी मात्र महाविकास आघाडीच्या निष्काळजीपणामुळे जनतेवर माझा जीव माझीच जबाबदारी असे म्हणण्याची वेळ आली आहे अशी टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

संगमनेर तालुक्यातील निमोण येथे ग्रामपंचायत आणि स्वयंसेवी संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते,

विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांनाही टोला लगाविला. विखे म्हणाले जनतेला सल्ले देण्यापेक्षा प्रवरे प्रमाणे व्यवस्था उभी केली असती तर कोरोनाच्या काळात जनतेला दिलासा मिळाला असता. या संकट काळात लोकांना मदत करून आधार देण्याची गरज होती मात्र मंत्री दौरे करून काळजी करण्याचे सल्ले देतात आणि आढावा बैठकांचा फार्स आहे. सरकारी यंत्रणेचे सोडा मंत्र्यांनी स्वतः हून काय केले नागरिकांसाठी असा सवालही विखे यांनी केला.

Web Title: Sangamner Nimon Covid center innovation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here