Home क्राईम संगमनेर तालुका घटना: अल्पवयीन मुलीवर एक वर्षभर लैंगिक अत्याचार

संगमनेर तालुका घटना: अल्पवयीन मुलीवर एक वर्षभर लैंगिक अत्याचार

Sangamner One year of sexual abuse of a minor girl

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे. याबाबत आरोपीविरुद्ध शनिवारी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

राजेंद्र नामदेव कांदळकर रा. जोर्वेकर वस्ती तळेगाव दिघे असे या आरोपीचे नाव आहे.

राजेंद्र कांदळकर याने १६ वर्ष ३ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीवर एक वर्षापासून वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला यातून पिडीत मुलगी सहा महिन्याची गरोदर राहिली. पिडीत मुलीचे आई वडील शेळी चारण्यासाठी बाहेरगावी गेले असता आरोपी राजेंद्र कांदळकर याने हे मुलीच्या इच्चेविरुद्ध ह्या अत्याचाराचे कृत्य केले. कोणाला काही सांगू नको अशी धमकी देण्यात आली. अत्याचारातून पिडीत मुलगी गरोदर राहिल्याने आई वडिलांसमवेत पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांसह गुन्हा नोंदविण्यात आला आहे, अधिक तपास पोलीस उप निरीक्षक आर.एस. सानप हे करीत आहे.   

Web Title: Sangamner One year of sexual abuse of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here