Home संगमनेर धूमस्टाईलने मोबाईल पळविणारे संगमनेर पोलिसांनी केले जेरबंद

धूमस्टाईलने मोबाईल पळविणारे संगमनेर पोलिसांनी केले जेरबंद

Sangamner police arrest mobile phone smuggler

Sangamner | संगमनेर: दुचाकीवरून येत  धूमस्टाईलने नागरिकांच्या हातातील मोबाईल पळविणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांच्या ही कारवाई केली आहे. यावेळी आरोपींकडून सव्वा तीन लाख रुपयांचे १८ मोबाईल आणि दीड लाख रुपये किमतीची बुलेट दुचाकी हस्तगत केली आहे.

याप्रकरणी अजय सोमनाथ पवार रा. विंचूर दळवी ता. सिन्नर व एका अल्पवयीन मुलाला संगमनेरमधून ताब्यात घेतले आहे. १४ मे रोजी आनंद बनभैरू हा तरुण नाशिक रस्त्यावरून मोबाईलवर बोलत पायी जात असताना यावेळी पाठीमागून दुचाकीवरून   आलेल्या दोघांनी त्याच्या हाताला हिसका देऊन त्याचा मोबाईल पळविला होता. तत्पूर्वी महिनाभर अगोदर पुणे नाशिक बायपास रस्त्यावरील राजापूरच्या पुलाजवळून नाशिक येथील राजेंद्र माळवे यांचाही मोबाईल अशाच पद्धतीने लांबविण्यात आला होता. या दोन्ही घटनांची नोंद संगमनेर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांनी पथकास सूचना देऊन तपासकामी रवाना केले. या पथकाने आसपासच्या सीसीटीव्ही फुटेज व चोरट्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले आहे.

Web Title: Sangamner police arrest mobile phone smuggler

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here