Home संगमनेर संगमनेर : तरूणाचा बुडून मृत्यू

संगमनेर : तरूणाचा बुडून मृत्यू

संगमनेर : तरूणाचा बुडून मृत्यू

आश्वी :आज सकाळी संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथिल तरुणाचा प्रवरा उजव्या कालव्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. राहुल दत्तू वर्पे (वय-३२) या तरुणाचे नाव आहे.

You May Also LikeShraddha Kapoor Upcoming Movies 
राहुल वर्पे हा सकाळी आपल्या शेतातून घरी येत असताना स्मशानभूमी जवळ असलेल्या जुन्या पुलाशेजारी येताचंं त्याची दुचाकी घसरल्याने तो तरुण थेट प्रवरा उजव्या कालव्यात जाऊन पडला. यावेळी गावातील शंभर ते सव्वाशे तरुणांनी शोधाशोध केली. तरुणांच्या शोधानंतर राहुल वर्पे याचा मृतदेह सापडला असून तो उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी येथील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याठिकाणी आश्वीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय उजे यांनी घटनास्थळी भेट दिली. दुर्देवी निधनाने ओझर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here