Home संगमनेर संगमनेर: ऊस तोडणी कामगारांच्या झोपड्यांना आग

संगमनेर: ऊस तोडणी कामगारांच्या झोपड्यांना आग

Sangamner Sugarcane harvesters hut fire 

संगमनेर | Sangamner: तालुक्यातील समनापूर येथील ऊस तोडणी कामगारांच्या तीन झोपड्यांना आग लागून साहित्य, धान्य व रोख रक्कम जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.  यावेळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

समनापूर परिसरात ऊस तोडणी कामगारांच्या ३० ते ४० झोपड्या आहेत. या झोपड्यात राहणारे ऊस तोडणी कामगार ऊस तोडणीसाठी गेले असताना दुपारी अचानक एका झोपडीला आग लागली. यावेळी पोलीस पाटील शेरमाळे यांनी साखर कारखाना अग्निशामन विभागाला व ऊस तोडणी कामगारांना कळविले.   काही वेळातच बंब दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश आले. या आगीमध्ये तीन झोपड्या पूर्ण जळून खाक झाल्या.

या झोपड्यांमधील साहित्य, धान्य, कपडे व रोख रक्कम जळून कामगारांचे मोठे नुकसान झाले.  या मजुरांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी सरपंच व उपसरपंच यांनी केली आहे.

Web Title:  Sangamner Sugarcane harvesters hut fire 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here