Home संगमनेर संगमनेर: घाटात जेष्ठ पत्रकाराचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

संगमनेर: घाटात जेष्ठ पत्रकाराचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

Sangamner:  जेष्ठ पत्रकार यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती समोर आली आहे.

Sangamner Suicide body of a senior journalist was found in the ghat

संगमनेर (सतिश फापाळे):  तालुक्यातील पठार भागातील बोटा गावातील ६१ वर्षीय ज्येष्ठ पत्रकार सुरेश भागवत टंगसाळे यांनी चंदनापुरी घाटात घाटात विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना बुधवार दि.२३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:३० मिनिटांच्या दरम्यान उघडकीस आली आहे.

ग्रामीण भागातील बोटा गावासह परिसरात वर्तमान पत्र वितरणाचे काम करत असताना त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात विविध सामाजिक प्रश्नांवर वार्तांकन करत त्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची भूमिका बजावली. पत्रकारितेतून आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवला होता. बोटा गावात पोस्ट ऑफिस मध्ये काम करताना त्यांनी श्रीरामपूर,संगमनेर पोस्ट ऑफिस मध्ये देखील सेवा केली. संगमनेर येथे सेवा निवृत्त झाल्यानंतर गावातील मंदिरांच्या पूजेची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडली.

ज्येष्ठ पत्रकार सुरेश भागवत टंगसाळे यांच्या मुलाचे मागील वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद  निधन झाले होते.मुलाच्या मृत्यूने त्यांना जबरदस्त धक्काच बसला होता.तेव्हापासून त्यांची मनस्थिती ठीक नव्हती. या दुःखातून त्यांना सावरता आले नाही.

संगमनेर पोलिसांना चंदनापुरी घाटात विषारी औषध प्राशन केलेल्या परिस्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने पठार भागातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Web Title: Sangamner Suicide body of a senior journalist was found in the ghat

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here