संगमनेर: विवाहित तरुणीची आत्महत्या, पतीसह सासू सासरे यांच्यावर गुन्हा
संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरात रविवारी रात्री अकोले नाका येथील लालातारा हौसिंग सोसायटी येथे एका नवविवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी मयताचे वाडील यांनी दिलीप रमेश श्रीराम संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादिवरून आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासू सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैष्णवी राहुल घोडेकर वय २१ असे या आत्महत्या केलेल्या नवविवाहित तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी फिर्यादीनुसार आपली मुलगी वैष्णवी हिने राहुल घोडेकर याच्यासोबत आंतरजातीय विवाह केला होता. हा विवाह सासू सासरे यांना अमान्य होता. मयत वैष्णवी हि माहेरून तीस हजार रुपये घेऊन येण्याची मागणी पती व सासू सासरे करत असल्याने तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते. यांच्या जाचाला कंटाळून वैष्णवी माहेरी निघून आली होती. तरी देखील फोन वरून तिला वारंवार त्रास देण्याचे काम सुरु होते. याच त्रासाला कंटाळून वैष्णवी हिने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. याप्रकरणी पती राहुल घोडेकर, सासू कांताबाई पांडुरंग घोडेकर, सासरा पांडुरंग नामदेव घोडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक साबळे हे करीत आहेत.
Web Title: Sangamner Suicide of a married woman