Sangamner: संगमनेर तालुक्यात १३ करोना रुग्णांची भर
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात 13 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या 4117 वर पोहोचली आहे.
सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरातील साईनगर येथे 55 वर्षीय महिला, सूर्यनगर येथे 39 वर्षीय पुरुष बाधित आढळून आले आहेत.
तर तालुक्यातून निमगाव बुद्रुक येथे 45 वर्षीय पुरुष, वरुडी पठार येथे 29 वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक येथील 27 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथे 23 वर्षीय महिला, मनोली येथील 35,18 वर्षीय महिला, 13 वर्षीय बालिका, खांडगाव शिवारातील 57 वर्षीय पुरुष करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या 4 हजार 17 इतकी झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Sangamner Taluka 13 corona infected Monday