Sangamner: संगमनेर तालुक्यात करोनाचे वाढतेच संक्रमण १६ बाधित
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव हा सुरुवातीपासून सुरूच आहे. त्यामुळे तालुक्याने अठराशे रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. संगमनेर तालुक्यातील गुरुवारी सायंकाळी १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या १८१५ वर पोहोचली आहे.
प्राप्त झालेल्या अहवालानुसार शिवाजीनगर येथे ७८,४८,३२,३१ वर्षीय महीला, १ वर्षीय बालिका, रंगारगल्ली येथे ९० वर्षीय महिला, गिरीराजनगर येथे ५९ वर्षीय पुरुष, तर तालुक्यातून संगमनेर खुर्द येथे ३८ व १६ वर्षीय महिला, ७ वर्षीय बालक, वाघापूर येथे ४५ वर्षीय तरुण, रहिमपूर येथे ५७ वर्षीय महिला, साकुर येथे ७५ वर्षीय पुरुष, ५९ वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द येथे ७० वर्षीय महिला, मंगळापूर येथे ६३ वर्षीय पुरुष यांना करोनाची लागण झाली आहे. गुरुवारी १६ बाधित आढळून आल्याने एकूण करोनाबाधितांची संख्या १८१५ इतकी झाली आहे.
Web Title: Sangamner Taluka 16 new corona infected