Home संगमनेर Sangamner: संगमनेर शहरात १३ तर ग्रामीण भागात ५ करोनाबाधित

Sangamner: संगमनेर शहरात १३ तर ग्रामीण भागात ५ करोनाबाधित

Sangamner taluka 18 corona infected today

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरात आज शुक्रवारी १३ तर ग्रामीण भागात ५ करोनाबाधित नव्याने आढळून आले आहेत. यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

संगमनेर शहरातील रंगारगल्ली येथे सहा रुग्ण आढळून आले आहेत. यात ६२,२९,६ वर्षीय महिला, ९ व २७ वर्षीय पुरुष आणि एक ५ महिन्याची बालिका करोनाबाधित आढळून आली आहे. माळीवाडा येथे ३२ वर्षीय पुरुष, २ वर्षीय बालिका यांना करोनाची लागण झाली आहे. मालदाड रोड येथे ३० वर्षीय महिला, पदमानगर येथे ४५ वर्षीय पुरुष, जनता नगर येथे २९ वर्षीय पुरुष व ३१ वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत. पोलीस कॉलनी येथे २६ वर्षीय महिलेला करोनाची बाधा झाली आहे.

संगमनेर तालुक्यात आश्वी खुर्द येथे ४३ वर्षीय पुरुष, निम्बाळे येथे ४२ वर्षीय पुरुष, कनोली येथे ५४ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे ६० वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ३९ वर्षीय पुरुष असे पाच ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

यामध्ये संगमनेर पोलीस ठाण्यातील दोन महिला पोलीस तर दोन पुरुष पोलीस असे  चार पोलीस करोनाबाधित आढळून आले आहेत. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Sangamner taluka 18 corona infected today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here