Home अहमदनगर Sangamner: संगमनेर तालुक्यात २३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Sangamner: संगमनेर तालुक्यात २३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Sangamner Taluka 23 corona positive

संगमनेर | Sangamner: (संजय गोपाळे) (शुक्रवार दि.१६):  आज खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीतून २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  त्यामुळे संगमनेर तालुक्यात मोठा दिलासा मिळाला आहे.

आज  कोरोना बाधित आढळून आलेल्या संगमनेर शहरातील मालदाड रोड  भागातील ६२ व ३७ वर्षीय महिला , कुंभार आळा  ३० वर्षीय तरुण व सदा-शंकर नगर  १४ वर्षीय मुलगा, कोल्हेवाडी रोड  ४९ वर्षीय महिला, संगमनेर  मधील ७२ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीसह ४० वर्षीय तरुणाचा अहवालही पॉझिटिव आला आहे.

संगमनेर शहरा बरोबर तालुक्यातील रुग्ण संख्येतही आज कमालीची घट झाली आहे. आज तालुक्यातील ग्रामीण भागात १६  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये ६ रुग्ण एकट्या सारोळे पठार येथील आहेत. तसेच खळी पिंपरी येथील ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक, आश्वी बु, येथील ३६ वर्षीय महिला, कोल्हेवाडी १४वर्षीय मुलगी, जोर्वे ७० वर्षीय महिला,

सारोळे पठार  ३२ व २३ वर्षीय महिलेसह २८ वर्षीय तरुण, तसेच ६ वर्षाच्या एका लहान मुलगी तसेच २ वर्ष वय असलेले 2 बालक, तळेगाव दिघे २१  वर्षीय महिला, ढोलेवाडी  ३४ वर्षीय तरुण, घुलेवाडी  ३४ वर्षीय तरुण, कोकणगाव  ६० वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती, अंभोरे २७ वर्षीय महिला व राजापुर ३४ वर्षीय तरुणाचा अहवाल कोरोना संक्रमित आला आहे. आज  संगमनेर शहरातील ७ जणांसह तालुक्यातील १६ जणांचे अहवाल पॉझिटिव आल्याने तालुक्याच्या रुग्णसंख्येत २३ जणांची भर पडून संगमनेर तालुका ४ हजार ९ वर पोहोचला आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Taluka 23 corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here