Home अहमदनगर Sangamner: संगमनेर तालुक्यात ३२ नवे करोनाबाधित

Sangamner: संगमनेर तालुक्यात ३२ नवे करोनाबाधित

Sangamner Taluka 32 new Corona infected

संगमनेर | Sangamner: सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने ३२ रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी संख्या ही घटलेली होती. त्यातच सोमवारी थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे.

सोमवारी शहरातील कोष्टी गल्लीतून ४ रुग्ण समोर आले. त्यात ८५ व ५० वर्षीय महिलेसह ५५ वर्षीय व्यक्ती, तसेच ८ वर्षीय लहान मुलगी,  चंद्रशेखर चौकातून ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल कोरोना संक्रमित आढळून आला  आहे. आज पठारावरील अकलापूरसह चंदनापुरी घाटाच्या जवळ असलेल्या आनंदवाडी मधून सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत.

ग्रामीण भागातून आज एकूण २७ रुग्ण समोर आले. त्यात आनंदवाडी येथील ५२ व्यक्तीसह ४० व ३५ वर्षीय तरुण, ४५, ३८ व २१ वर्षीय महिला, तसेच १२ व ४ वर्षे वयाची २ मुले, झोळे येथील १८ वर्षीय  तरुण, संगमनेर खुर्द मधील ३० वर्षीय तरुण, जवळे बाळेश्वर येथील २९ वर्षीय तरुण, गुंजाळवाडी पठार येथील ४ वर्षीय बालक, जवळेकडलग येथील ५२ वर्षीय महिला, केळेवाडी येथील ६० वर्षीय इसमासह ५५ वर्षीय महिला, शेळकेवाडी ५५  वर्षीय महिला, भोजदरी  ३५ वर्षीय तरुण, कुरकुटवाडी २२ व १६ वर्षीय तरुण, आंबी दुमाला येथील १८ वर्षीय तरुणी, अकलापुर  ३७ व २० वर्षीय महिलेसह १७ व १५ वर्षीय तरुण, तळेगाव येथील ३० वर्षीय तरुण व वडगाव पान येथील ६८ वर्षीय पुरुष यांचा  समावेश आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Sangamner Taluka 32 new Corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here