Home संगमनेर संगमनेर तालुका 36 व्या शतकाच्या उंबरठ्यावर, गुंजाळवाडीत अॅटीजेन टेस्ट

संगमनेर तालुका 36 व्या शतकाच्या उंबरठ्यावर, गुंजाळवाडीत अॅटीजेन टेस्ट

Sangamner Taluka 36th hundred near corona patient

संगमनेर | Sangamner: तालुक्यात गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात 39 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यामुळे तालुक्याची रुग्ण संख्या 36 व्या शतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे.

तालुक्यातील शहरालगत गुंजाळवाडी गावात करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रॅपिड अॅटीजेन टेस्ट तीन दिवस सकाळी 9:30 ते 12:00 वाजेपर्यंत ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, गुंजाळवाडी येथे करण्यात येणार आहे. तरी गावातील ग्रामस्थांनी उत्फूर्तपणे न घाबरता आपली करोना चाचणी करून घ्यावी व आपला करोनापासून बचाव करावा असे आवाहन गुंजाळवाडी गावचे सरपंच सौ. वंदनाताई गुंजाळ, उपसरपंच अमोल गुंजाळ यांनी केले आहे. तसेच करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गुंजाळवाडी गाव सहा दिवसांकरिता बंद ठेवण्यात आले आहे.   

दरम्यान ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, गुंजाळवाडी येथे काल रॅपिड अॅटीजेन टेस्ट घेण्यात आली यामध्ये 52 व्यक्तींचे स्त्राव घेण्यात आल्या असून त्यातील घुलेवाडी येथील एक जण करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर 51 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.    

गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात कुरण रोड 35 वर्षीय पुरुष, मारवाडी गल्ली 60 वर्षीय पुरुष, गणेश नगर येथे 44 वर्षीय महिला, जनतानगर येथे 37 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, मालदाड रोड येथे 74 वर्षीय महिला, संगमनगर येथील 50 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत. 

तर तालुक्यात जोर्वे येथे 68, 43,40 वर्षीय महिला, 15 वर्षीय बालक, उंबरी बाळापूर येथे 60 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथे 28 वर्षीय महिला, कोकणगाव येथे 67 वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथे 50 वर्षीय महिला, साकुर येथे 51 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष,  आश्वी खुर्द येथील 73 वर्षीय पुरुष, 67 वर्षीय महिला, झरेकाठी मधील 51 वर्षीय पुरुष, हंगेवाडी येथे 32 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुण, रहिमपूर येथे 50 वर्षीय पुरुष,निमोण येथील 19 वर्षीय तरुण, घुलेवाडी मधील 55, 27,23 वर्षीय महिला, निळवंडे मधील 30 वर्षीय तरुण, सोनुशी येथे 63 वर्षीय महिला, दाढ बुद्रुक येथे 45 वर्षीय पुरुष, वडगाव लांडगा येथे 45 वर्षीय पुरुष,  सुकेवाडी येथे 40, 21,17 वर्षीय पुरुष, 46,40,38 वर्षीय महिला,12 वर्षीय बालिका बाधित आढळून आली आहे. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या 3 हजार 596 इतकी झाली आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Sangamner Taluka 36th hundred near corona patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here