Home Suicide News संगमनेर तालुक्यात विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, सासरच्या मंडळीवर गुन्हा

संगमनेर तालुक्यात विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, सासरच्या मंडळीवर गुन्हा

Sangamner taluka ashvi Married women Suicide

संगमनेर | Suicide:  तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे मयुरी पवन सारबंदे (वय २४) या विवाहित महिलेने सासरच्या छळास कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला असून सासरच्या तिघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अशोक वर्पे यांनी आश्वी पोलीस पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हंटले आहे की,  माझी मुलगी मयुरीचा विवाह २०१७ मध्ये पवन सारबंदे यांच्याबरोबर झाला होता. पती पवन सारबंदे, भाया अरुण सारबंदे व जाव वैशाली उर्फ बाली सारबंदे हे जमीन व गायी खरेदीसाठी मुलीने माहेरहून ५० हजार रुपये आणावेत यासाठी नेहमी शिवीगाळ करत होते. त्यामुळे पैसे आल्यानंतर देऊ असे आम्ही तिच्या सासरच्या मंडळीना सांगितले होते. २०१८ मध्ये नात भाजल्यामुळे मयुरीच्या चुकीमुळेचं भाजल्याचे सांगत तिला जास्त त्रास त्रास दिला गेला.

२०२० च्या सुरवातीपासून किरकोळ करणातून शिवीगाळ व मारहाण करुन पैसे आणण्यासाठी बळजबरी केली जात होती. त्यामुळे ५, १० हजार असे करून  १ लाख रुपये सासरच्या मंडळींना दिले आहेत. परंतु मुलीला त्रास व पैशाची मागणी सुरुच होती.

९ ऑगस्ट रोजी मयुरीने विहिरीत उडी मारल्यामुळे लोणी येथे उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती नवरा पवन याने दिली. त्यामुळे मी रुग्णालयात गेल्यानंतर मुलगी मयत झाल्याची माहिती मिळाली. पैशासाठी मयुरीचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला, या छळास  वैतागून तिने आत्महत्या केली.

Job vs Business in Hindi | Business Tips | व्यवसाय से लाखो कमावो, यह व्हिडियो मोटिवेशन

पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहे. गुरुवारी रात्री उशिरा शोकाकूल व तणावपूर्ण वातावरणात मयत मयुरीवर उंबरी बाळापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दरम्यान पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Sangamner taluka ashvi Married women Suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here