संगमनेर तालुक्यात अज्ञात चोरट्यांनी कापड दुकान फोडले, लाखोंचा मुद्देमाल चोरीस
संगमनेर | Theft: संगमनेर तालुक्यातील घारगाव बस स्थानक परिसरातील महालक्ष्मी कलेक्शन कापड दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या चोरीत सव्वा लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव बस स्थानक परिसरात असलेले महालक्ष्मी कलेक्शन कापड दुकान सोमवारी अज्ञात चोरट्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास फोडले.. घारगाव बसस्थानक परिसरात सतीश शिवाजी आहेर यांच्या मालकीचे महालक्ष्मी कलेक्शन व टेलर्स हे कापड दुकान आहे. दीपावली सुरु झाल्याने आहेर यांनी मोठ्या प्रमाणात कापड व कपडे खरेदी करून ठेवले होते. दिवाळीमुळे रात्री उशिरापर्यंत दुकानात कपडे लावण्याचे काम सुरु होते. त्यानंतर सतीश आहेर रात्री घरी गेले मात्र अज्ञात चोरट्यांनी सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी दुकानच्या मागील बाजूने वरचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. त्यांनी दुकानातील कापड व रोख रक्कम असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. सकाळच्या सुमारस सतीश आहेर यांना चोरीची घटना निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी घारगाव पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.वर्दळीच्या दुकान फोडल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
Web Title: Sangamner Taluka cloth store theft