Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात ४१ जण करोनाबाधित

Sangamner: संगमनेर तालुक्यात ४१ जण करोनाबाधित

Sangamner taluka Corona positive Report 41 infected

संगमनेर | Sangamner: तालुक्यात प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात २८ तर ग्रामीण भागात २३ असे एकूण ४१ जण बाधित आढळून आले आहे. सध्या ३३९ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून काल ३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

संगमनेर शहरात विद्यानगर येथे ४९ वर्षीय महिला, पदमानगर येथे ५७ वर्षीय पुरुष, ३ वर्षीय मुलगा, ८६ वर्षीय महिला,  संगमनेर येथे ३२ वर्षीय पुरुष, जाणता राजा मैदान येथे ६३ वर्षीय पुरुष, जनता नगर पूर्व येथे ७० वर्षीय महिला, गोविंद नगर येथे २४ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुष, रंगारगल्ली येथे २०,२४ वर्षीय पुरुष, चैतन्यनगर येथे ५ वर्षीय मुलगी, अभिनव नगर येथे १६ वर्षीय मुलगी,  साई नगर येथे ३५ वर्षीय पुरुष, गणेशनगर येथे ४५ वर्षीय पुरुष, बाजारपेठ येथे ४५ व २० वर्षीय महिला, इंदिरानगर गल्ली नंबर १ येथे ४२ वर्षीय पुरुष असे  १८ जण बाधित आढळून आले आहेत.

संगमनेरातील ग्रामीण भागातून वडगाव लांडगा येथील २६,२६ वर्षीय महिला, खांडगाव येथील ३५ वर्षीय पुरुष, वाघापूर येथे ४७ वर्षीय पुरुष, कौठ कमळेश्वर येथे ४९ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ६५ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला,  गुंजाळवाडी येथे २२ वर्षीय महिला, घारगाव येथे ५९ वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द येथे ६५ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे ५५ वर्षीय महिला, ५७,३१  वर्षीय पुरुष,   चनेगाव येथे २७ वर्षीय महिला, कौठ खुर्द येथे ६८ वर्षीय पुरुष, कोकणगाव येथे ८९ वर्षीय पुरुष, पोखरी बालेश्वर येथे १८ वर्षीय पुरुष, समनापूर येथे ४५ वर्षीय महिला, निमगाव जाळी येथे ५२ वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथे ३५ वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे ४३ वर्षीय पुरुष,  रायतेवाडी  येथे ३० वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे ७० वर्षीय महिला असे २३ जण बाधित आढळून आले आहेत.  

Web Title: Sangamner taluka Corona positive Report 41 infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here