Home संगमनेर संगमनेर तालुक्यात सरपंचपदाची शपथ घेण्यासाठी हेलिकॉप्टरनेच एन्ट्री

संगमनेर तालुक्यात सरपंचपदाची शपथ घेण्यासाठी हेलिकॉप्टरनेच एन्ट्री

Sangamner Taluka Helicopter entry for swearing-in of Sarpanch

संगमनेर | Sangamner: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अंगावर शहारे आणणारे दृश्य पहायला मिळाले. गावभर सनई चौघडचा निनाद आवाज ढोल ताशांचा गजर, नागरिक तरुण लेझीम खेळण्यात गुंग झाले होते.

एखाद्या मुलाच्या लग्नाची तयारी नाही अशी तयारी सरपंच पदाची शपथ घेण्यासाठी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष म्हणजे सरपंच साहेबांनी शपथ घेण्यासाठी थेट हेलिकॉप्टरनेच एन्ट्री घेतली. यावेळी संपूर्ण गाव भावूक होऊन त्यांच्या नेतृत्वाकडे बघत होते. संपूर्ण गावातील महिला फेटे बांधून सज्ज होत्या. हा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण गाव आले होते. एखाद्या मुख्यमंत्र्याला लाजवेल असा शपथविधी पार पडला. सरपंचाचे हेलिकॉप्टरनेच एन्ट्री होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. बारा बैलांच्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली होती. संगमनेर तालूक्यातील आंबी दुमाला या गावात हा शपथविधी सोहळा रंगला होता.

तरुण उद्योजक जालिंदर गागरे यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत. अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध त्यांनी करून दिला आहे. जालिंदर गागरे पुण्यात राहत असले तरी गावाशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे. गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी निवडणूक लढविली. या निवडणुकीत संपूर्ण उमेदवार त्यांचे निवडून आले. योगायोगाने सर्वसाधारण पुरुष आरक्षण निघाल्याने आज सर्वानुमते सरपंचपदी विराजमान झाले आहेत. संपूर्ण गावाचा विकास हेच ध्येय असल्याचे जालिंदर गागरे यांनी म्हंटले आहे.

Web Title: Sangamner Taluka Helicopter entry for swearing-in of Sarpanch

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here