Home संगमनेर संगमनेरात भर रस्त्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले

संगमनेरात भर रस्त्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले

Sangamner theft snatched gold ornaments from a woman's neck

संगमनेर | Theft: चोरट्यांनी सहा लाख रुपयांची रोकड लांबविण्याचा प्रकार काल दुपारी घडल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या अंगावरील सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचा प्रकार रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील विधी महाविद्यालयाजवळ घडला. 

विधी महाविद्यालयाच्या परिसरात एक महिला रस्त्यावरून जात असताना पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी त्या महिलेच्या गळ्यातील दागिने लांबविले. या महिलेने आरडाओरडा करताच नागरिक घटनास्थळी जमा झाले. याबाबत शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. या चोरीची माहिती समजताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, हे आपल्या सहकारी कर्मचार्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरट्यांचा शोध घेतला.मात्र चोरांचा तपास लागला नाही. चोरट्यांनी वापरलेली पल्सर मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. 

Web Title: Sangamner theft snatched gold ornaments from a woman’s neck

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here