Home क्राईम संगमनेर: खांडगाव फाट्यावर चोरट्यांनी एका शिक्षकाला लुटले

संगमनेर: खांडगाव फाट्यावर चोरट्यांनी एका शिक्षकाला लुटले

Sangamner Thieves robbed a teacher

संगमनेर: अज्ञात चोरट्यांनी जिजाभाऊ रभाजी नेहे रा. गणेश विहार मालदाड रोड संगमनेर या प्राथमिक शिक्षकास अडवून लुटल्याची घटना घडली आहे.

ही घटना खांडगाव फाटा येथे मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली.

जिजाभाऊ हे शिक्षक सावरगाव तळ येथे आपल्या गावाहून संगमनेरला येत असताना खांडगाव फाट्याजवळ मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास अज्ञात तीन मोटार सायकलस्वरांनी नेहे याची मोटारसायकल अडवून त्याच्याजवळील रेड मी कंपनीचा मोबाईल व गाडीची चाबी काढून घेत पलायन केले.

हा प्रकार समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांनी चोरट्याचा शोध घेतला मात्र चोरटे पळून गेले.

जिजाभाऊ नेहे यांनी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करीत आहे.

Web Title: Sangamner Thieves robbed a teacher

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here