Home संगमनेर कांद्यानं रडवलं, आता अवकाळी पावसाचे संकट, संगमनेरमध्ये अवकाळी

कांद्यानं रडवलं, आता अवकाळी पावसाचे संकट, संगमनेरमध्ये अवकाळी

Sangamner unseasonal  rain:  अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आणखी चिंतेत.

Sangamner unseasonal  rain

संगमनेर: संगमनेर ग्रामीण भागात आज अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने जिल्ह्यात काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता. संगमनेर तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी गारा पडल्या आहेत. विजेचा प्रवाह देखील खंडित करण्यात आला होता.

संगमनेरसह जिल्ह्यात  अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. गहू, हरभरा, मसूर, वाटाणा यासह कांदा उत्पादकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. तर अवकाळी पावसामुळे शेतकरीही चिंतेत पडले आहेत. शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे.

अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे शेती पिकावर मोठा परिणाम झाला आहे. अगोदरच कांदा, पालेभाज्या, कोबी यासारख्या काही भाज्यांना बाजारात चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सुतलानही संकटासह अस्मानी संकटामुळे शेतकरी आणखी चिंतेत आले आहेत.

तालुक्यातील ग्रामीण भागात झालेल्या पावसानं काढणीसाठी आलेला गहू हरभऱ्याची पिकांची नुकसान झाली आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेत्तात गहू, कांदे काढण्याचे काम सुरु आहे.  अगोदरच भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला होता. आता पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झाल्याने संकटात सापडला आहे.

Web Title: Sangamner unseasonal  rain

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here