Home संगमनेर संगमनेर: नदीपात्रात उडी, तरुणाचा मृत्यू

संगमनेर: नदीपात्रात उडी, तरुणाचा मृत्यू

Breaking News | Sangamner: प्रवरा नदीच्या पुलावर नदीपात्रात उडी घेतलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना.

Sangamner Youth jumps into riverbed, dies

संगमनेर : तालुक्यातील जोर्वे येथील प्रवरा नदीच्या पुलावर नदीपात्रात उडी घेतलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना  गुरुवारी (दि. २३) दुपारी ४:२७ वाजण्याच्या पूर्वी घडली. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नितीन भागवत थिटमे (वय ३२, रा. पोखरी हवेली, ता. संगमनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे.धरणातून पाणी सोडल्याने नदीला सध्या पाणी आहे. त्याचे मोठे बंधू किसन भागवत थिटमे (वय ३६, रा. पोखरी हवेली, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहायक फौजदार एस. एस. टोपले पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Sangamner Youth jumps into riverbed, dies

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here