ब्रेकिंग न्यूज! संगमनेरात अवकाळी पावसाने उडाली धांदल, पिकांचे नुकसान
Breaking News | Rain: संगमनेरात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने धांदल उडाली आहे.
संगमनेर: संगमनेर शहरात तसेच परिसरातील गावांमध्ये अचानक आलेल्या पावसाने एकच धांदल उडाली. शनिवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास जवळपास अर्धा तास धुवाधार पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरु होताच वीजपुरवठा खंडित झाला होता. अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. हातातोंडाशी आलेला गहू पिकाचे, हरभरा, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.
तालुक्यातील गुंजाळवाडी, खांडगाव, निमज नांदुरी दुमाला निमगाव पागा, सावरचोळ, निमगाव खुर्द, सांगवी, पेमगिरी परिसरात अवकाळी पाउस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटाने शेतकरी हतबल झाला आहे. अगोदरच रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी मेटाकुटिला आला आणि त्यातच अधिक अवकाळी पावसाने कंबरडे मोडले आहे.
महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. कर्नाटक राज्य त्याच्या किनारी जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे, भारतीय हवामान विभागने येलो अलर्ट जारी केला आहे. काही दिवसांनी देशातील तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. ९ जानेवारीला पर्वतीय भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थंडी वाढेल. सध्या उत्तराखंडमधील हवामान कोरडे असून बहुतांश भागात सूर्यप्रकाश आहे.
Web Title: Sangamner unseasonal rain caused damage to crops
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News