संगमनेरच्या मायलेकांना कारने उडवले, अपघातात आईचा मृत्यू, मुलगा गंभीर
Ahmednagar News: रस्त्यावर मायलेकाच्या मोटारसायकलला कारने उडवल्याने भीषण अपघाताची (Accident) घटना, या भीषण अपघातात आईचा मृत्यू, मुलगा गंभीर झाला आहे.
राहुरी: देवळाली प्रवरा शहरालगत श्रीरामपूर रस्त्यावर मायलेकाच्या मोटारसायकलला कारने उडवल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात मायलेक गंभीर जखमी झाले. आईचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. मुलाचा एक हात व एक पाय या अपघातामध्ये निकामी झाल्याचे समजते. मयत व जखमी संगमनेर तालुक्यातील कोंची मांची येथील आहेत.
अभिजित पोपट वाघमारे (वय १६) केले. व संगीता पोपट वाघमारे (वय ४५) हे दोघे राहणार कोंची मांची हे श्रीरामपूरहून राहुरी फॅक्टरीच्या दिशेने दुचाकी क्रमांक एम एच १६ एपी ३५८ वरून येत होते. देवळाली प्रवरा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर राहुरी फॅक्टरीकडून श्रीरामपूरच्या दिशेने जाणाऱ्या इंडिगो सीएसने कार क्रमांक एम एच १४ एक्स ६०४० या वाहनावरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने त्याने वाघमारे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेने सदर मायलेक जवळपास १५ ते २० फूट उडून जवळच्या शेतात जाऊन पडले. त्यांना जबर मार लागल्याने रुग्णवाहिकेत रवी देवगिरे, पप्पू कांबळे चालक नागरिकांच्या मदतीने दोघांना राहुरी फॅक्टरी येथील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. आई संगीता वाघमारे गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी विळद घाट येथे हालविण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
Web Title: Sangamner’s Milekas blown up by car, mother dies in accident, son critical
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App