Home महाराष्ट्र शिवसेना खासदार संजय राउत यांची रवानगी कोठडीत

शिवसेना खासदार संजय राउत यांची रवानगी कोठडीत

Sanjay Raut: संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी (ED) कोठडी. 

Sanjay Raut remanded in ED custody till August 4

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी (ED)कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने आठ दिवसांसाठी संजय राऊत यांची कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना केली होती. मात्र त्यांना 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे. न्यायमुर्ती एम जी देशपांडे यांनी सुनावणी घेतली होती.

पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात नऊ तासांच्या छाप्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी ईडीने ताब्यात घेतले होते. तपासात सहकार्य न केल्याचा आरोप राऊत यांच्यावर आहे. 1,000 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाने त्यांची आतापर्यंत 16 ते 17 तास चौकशी केली.

ईडीने संजय राऊत (Sanjay raut) यांना रात्रभर कोठडीत ठेवले. त्यानंतर आज  त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, ईडीने संजय राऊतच्या 8 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. ईडीच्या (ED) कोठडीच्या मागणीविरोधात संजय राऊत यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. यापूर्वी ईडीने संजय राऊत यांना वैद्यकीय उपचारासाठी जेजे रुग्णालयात नेले होते.

कोर्टात सुनावणीदरम्यान संजय राऊत यांचे वकील अॅडव्होकेट अशोक मुंदरगी यांनी कोर्टाला सांगितले, संजय राऊत यांची अटक राजकीय हेतूने प्रेरित आहे. ते हृदयाशी संबंधित आजाराचे रुग्ण आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली. यासंबंधीची कागदपत्रे न्यायालयासमोर (Court) सादर करण्यात आली आहेत.

Web Title: Sanjay Raut remanded in ED custody till August 4

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here