राजूर गावच्या सरपंचपदी महाविकास आघाडीच्या सौ.पुष्पा निगळे
Rajur News: सदस्य पदाच्या निवडणुकीत भाजपला 11 तर महाविकास आघाडी ला 6 जागांवर समाधान मानावे लागले.
अकोले: आजी माजी आमदाराच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या, सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या राजूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत धक्कादायक निकालाची नोंद झाली. भाजपने चुरशीच्या निवडणूकीत ग्रामपंचायतमध्ये बहुमत मिळविले मात्र सरपंच पदाच्या निवडणूकीत निसटत्या पराभवास त्यांना सामोरे जावे लागले. सदस्य पदाच्या निवडणुकीत भाजपला 11 तर महाविकास आघाडी ला 6 जागांवर समाधान मानावे लागले.
अकोले तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत असणाऱ्या राजूर ग्रामपंचायतचे सरपंच पद हे अनुसूचित जमाती स्त्री राखीव जागेसाठी राखीव होते. पहिल्या पासूनच ही निवडणूक आजी- माजी आमदारांनी अतिशय अतिशय प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सौ.पुष्पा निगळे यांनी भाजपचे माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील सौ. शोभा देशमुख यांचा 19 मतांनी पराभव केला.
Rajur: ग्रामपंचायत निवडणूकीतील विजयी उमेदवार पुढील प्रमाणे-
वार्ड क्र.1
प्रमोद देशमुख महाविकास
अतुल पवार भाजप
संगीता मैड भाजप
वार्ड क्र.2
ओंकार नवाळी. महाविकास
संगिता मोहंडुळे महाविकास
संगीता जाधव. महाविकास
वार्ड क्र.3
रामा मुतडक. महाविकास
रोहिणी देशमुख. . भाजप
वार्ड क्र.4-
गोकुळ कानकाटे. भाजप
सुप्रिया डगळे. भाजप
सारिका वालझाडे भाजप
वार्ड क्र.5-
राम बांगर- भाजप
विमल भांगरे-भाजप
रोहिणी माळवे – महाविकास
वार्ड क्र.6-
गणपत देशमुख – भाजप
संतोष बनसोडे- भाजप
लता सोनवणे- भाजप
Web Title: Sarpanch of Rajur village Mrs. Pushpa Nigle of Mahavikas Aghadi