Home अहमदनगर अहमदनगर खळबळजनक: सरपंचाचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर खळबळजनक: सरपंचाचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

Ahmednagar Suicide Try:  घोटवी गावाचे युवा सरपंच यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर घडली घटना.  

Sarpanch's suicide attempt in the collector's office

अहमदनगर: श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी गावाचे युवा सरपंच अविनाश मिस्टर चव्हाण (वय 26) यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्याला पोलिसांनी तत्काळ श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांच्या वाहनातून जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.

Earn Money Online | या पाच मार्गाद्वारे तुम्ही महिन्याला २५ ते ३० हजार ऑनलाईन कमवू शकता!!!

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर जाऊन विषारी औषध घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बंदोबस्तासाठी नियुक्तीस असलेले पोलीस अंमलदार इरफान शेख यांनी चव्हाण यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. चव्हाण यांच्या जवळ एक चिठ्ठी सापडली असून यात त्यांना होणार्‍या त्रासाचे कारण नमूद असल्याचे समजते. सदरचा प्रकार नाजूक प्रकरणातून घडल्याचीही चर्चा सुरू आहे.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

व्हाण हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यासक करीत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याप्रकरणी जिल्हा रूग्णालयातून तोफखाना पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात घटना घडलेली असल्याने जिल्हा प्रशासनाकडून तक्रार प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी सांगितले.

Web Title: Sarpanch’s suicide attempt in the collector’s office

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here