Home क्राईम संगमनेर तालुक्यात सरपंचाच्या पत्नीचा विनयभंग

संगमनेर तालुक्यात सरपंचाच्या पत्नीचा विनयभंग

Sangamner Crime: लोकनियुक्त सरपंचाच्या पत्नीचा विनयभंग (Molested) केल्याची घटना, १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

Sarpanch's wife molested in Sangamner taluka

घारगाव : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका लोकनियुक्त सरपंचाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.  महिलेसह तिचा सरपंच पती, नातेवाईकांना शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. हा प्रकार बुधवारी (दि.०४) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास गावात घडला. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित ३० वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. गावातील दोन प्रमुख राजकीय व्यक्तींच्या समर्थनार्थ संगमनेर येथे गेल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल झालेल्यांनी पीडित महिलेच्या सरपंच पतीला ‘तुम्ही गावचा कारभार कसा चालवता, हे आम्ही पाहतो’ असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर महिलेच्या घरात घुसून तिला तिच्या पतीला व इतर नातेवाईकांना मारहाण करण्यात आली.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

पीडित व तिच्या घरातील इतर महिलांना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत त्यांना घराबाहेर ओढत आणले व जाताना पुन्हा त्यांचे मागे दिसले तर तुमची वस्ती जाळून टाकू. अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संगमनेर प्रभारी उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव हे घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: Sarpanch’s wife molested in Sangamner taluka

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here