Home अकोले राजूर – गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना...

राजूर – गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश.

राजूर – गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश.

अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाला घवघवीत यश मिळाले. विद्यालयाचा दहावीचा एकूण निकाल 92.85% लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाला, त्यात गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थांनी घवघवीत यश मिळविले. विद्यालयाचा एकूण निकाल 92.85% लागला असून त्यात सेमी वर्गाचा 100% निकाल लागला आहे. विद्यालयाचे पहिले तीन विद्यार्थी –

प्रथम क्रमांक – पाटील ऐश्वर्या गोपाळराव – 95.80%

द्वितीय क्रमांक – बांडे शुभांगी नामदेव – 93.20%

तृतीय क्रमांक – गोडे सुरज अमृता – 90.60%

तर बांडे शुभांगी नामदेव हिने गणित विषयात 100 मार्क्स, पाटील ऐश्वर्या गोपाळराव हिने गणित विषयात 99 मार्क्स, मुंढे साक्षी सुनील 98, मैड यश गणेश 97, चव्हाण अविनाश 95, लहामगे ओंकार ९४, ऐलमामे संध्या 91 ह्या विद्यार्थ्यांनी गणित विषयात विशेष असे प्राविण्य मिळविले.

अत्यंत महत्वाच्या या निकालाकडे सर्व विद्यार्थी शिक्षक व पालक आतुरतेने व कुतूहलाने वाट बघत होते , कारण विद्यार्थ्यांच्या कारकीर्दीच्या दृष्टीने दिशा ठरविण्याकरिता हा निकाल महत्वाचा मानला जातो.

For Even More Information Check This: Rajinikanth and Akshay Kumar’s 2.0 to postponed release date 2019

सत्यानिकेतन संस्थेच्या वतीने संस्थेचे मा.सचिव प्रा. टी. एन. कानवडे व सह सचिव श्री मिलिंदशेठ उमराणी, संचालक विलास पाबळकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्राचार्य श्री. लेंडे एम.डी. उपप्राचार्य पर्बत एल.पी. जेष्ठ शिक्षक गुजराथी सर, श्री.पाबळकर एस.एस. आणि सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती कर्मचार्यांनी अभिनंदन केले.

For Even More Information Check This: Kaala box office collection

तसेच मा. प्राचार्य श्री. लेंडे एम.डी. यांनी 5वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांना विद्यालयात प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here